megablock

रविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा

रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.

Jan 9, 2016, 11:16 PM IST

मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक

Jan 9, 2016, 07:44 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. 

Dec 17, 2015, 02:30 PM IST

मध्य रेल्वे विशेष ब्लॉक: आज रात्री १२ ते उद्या सकाळी ६ दरम्यान ब्लॉक

मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाला अखेर आज मध्यरात्रीचा मुहूर्त मिळालाय. मध्यरात्री १२ ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत एकही उपनगरी लोकल धावणार नाही.

Jun 7, 2015, 09:17 AM IST

लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी

लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतलाय. लोकलमधून पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी-घाटकोपर दरम्यान घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

Dec 31, 2012, 09:17 PM IST

पश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक

आज तुमचा कुठे फिरायला जायचा बेत असेल आणि रेल्वेने प्रवास करण्याचा मानस असेल तर जरा थांबा... कारण आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक राहणार आहे.

Jun 3, 2012, 10:08 AM IST

उद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.

Feb 4, 2012, 09:29 PM IST

'ब्लॉक' करणार मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'....

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत.

Dec 18, 2011, 05:48 AM IST

प. रेल्वेचा 'मेगाब्लॉक', प्रवासी मात्र 'ब्लॉक'

आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वेठीला धरले जाणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. डीसी विद्युत कर्षणाचे एसी विद्युत कर्षणामध्ये रुपांतरण करण्यासाठी पश्चिम रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे.

Nov 13, 2011, 04:39 AM IST

पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेने ट्रॅक्शन नेटवर्क डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेटिंग करंट) बदलण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. बांद्रा ते भाईंदर दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० दरम्यान रेल्वेसेवा पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. विलेपार्ले ते बोरिवली दरम्यान टॅक्शन नेटवर्कच्या कामासाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Nov 11, 2011, 05:00 PM IST