maruti swift cng

छोट्या फॅमिलीची पहिली फॅमिली कार, किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये!

घराबाहेर एक कार असावी असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. पण वाढती महागाई, खर्च यामुळे ते शक्य नसतं.तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल तर तुमच्यासाठी 6 बेस्ट पर्याय आम्ही देत आहोत. ज्याची किंमत 4 लाखांपासून सुरु होते.मारुती स्विफ्ट फोर्थ जनरेशन मॉडेल लीटरमागे 25 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.49 लाख इतकी आहे. टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह सीएनजीमध्येही येते. याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याची किंमत 6.12 लाख इतकी आहे.हुंडईने आपल्या छोट्या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलंय. यात सीएनजी व्हेरिएंटदेखील आहे. याची किंमत 5.92 लाख रुपये आहे.टाटा टियॅगोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले. याची किंमत 5.56 लाख रुपये आहे.मारुती वॅगनार 1.0 लीटर पेट्रोल आणि 1.2 लीटर सीएनजीसह येते. याची किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे. मारुती ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्याय आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Sep 30, 2024, 03:07 PM IST

Maruti ने लाँच केल्या 3 स्वस्त सीएनजी कार, 30 किमीपर्यंत मिळणार मायलेज

देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. दर महिन्याला येणाऱ्या आकडेवारीवरून ही बाब अधोरेखित होते. मारुति सुझुकीने नुकत्याच तीन नव्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत.

Nov 7, 2022, 04:20 PM IST