मराठा मोर्चेकऱ्यांकरता शिवसेनेने केली न्याहारीची सोय...
ठाणे जिल्ह्यातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाला शिवसेनेची मदत पडद्यामागून होत होती. परंतु, आता शिवसेनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला थेट पाठींबा दाखवला आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर तब्बल ७० हजार मोर्चेकऱ्यांना पुरतील इतके वडापाव आणि चहाची करण्यात आली असून नवी मुंबईतील करावे येथील तांडेल मैदानावर ३५ हजार थाळी कांदेपोहे मागविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने या कामात लक्ष घालत आहेत. ठाणे महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आवश्यक ‘रसद’ उभी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
Aug 9, 2017, 10:48 AM IST