maharaja animal museum

महाराजबाग प्राणी संग्रहालयातील कर्मचा-यांचा संप मागे

ऐतिहासिक महाराजबाग प्राणी संग्रहालयातील अस्थायी कर्मचा-यांनी अखेर संप मागे घेतला आहे. सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. महाराज बाग प्राणी संग्रहालयात 20 प्रजातींचे एकूण तीनशे पशु-पक्षी बंदिस्त असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इथल्या प्राण्यांना खुराक देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

Apr 15, 2017, 08:37 AM IST