kl rahul run out

श्रेयसचा एकच थ्रो... के एल राहुलचा करेक्ट कार्यक्रम

पुणे: IPL म्हटलं की उत्कंटा वाढवणारे क्षण आलेच. क्रिकेटमध्ये चपळाई आलीच. हिच चपळाई शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जाइंट्स (LSG) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR)  मॅचमध्ये सुद्धा पाहण्यास मिळाली. टॉस हारल्यानंतर लखनऊ सुपर जाइंट्सने बॅटिंगला सुरुवात केली. LSG कडून क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) आणि के एल राहुल ( K L Rahul ) मैदानात उतरले. दोघांनी सावध सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. मात्र दोघे सेट होण्यापूर्वीच KKR च्या कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer)  एक सटीक थ्रो लखनऊला दणका देऊन गेला. के एल राहुल चोरटी धाव घेण्याच्या तयारी असतानाच श्रेयसने राहुलला रन आऊट केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. 

May 8, 2022, 09:41 AM IST