jawan shaheed

 Sangli Vithurayachi Wadi Jawan Rahul Karande Martyr In Kashmir Pulwama Terror Attack PT3M22S

सांगली । दहशतवादी हल्ला , महाराष्ट्राचा सुपूत्र राहुल कारंडे शहीद

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राचा सुपूत्राचा यात समावेश आहे. अवंतिपुरातल्या हल्ल्यात जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे हुतात्मा झालेत. विठुरायाची वाडी गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांचा आकडा ४० वर पोहोचला आहे.

Feb 14, 2019, 08:55 PM IST

पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद

अरुणाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांना मदत करताना वायुदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील फ्लाईट इंजीनिअर राजेंद्र गुजर बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सापडला. राजेंद्र गुजर हे मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात येईल. तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Jul 10, 2017, 01:16 PM IST