इस्राईलने मोदींच्या सन्मानात फुलाचं नाव ठेवलं 'मोदी'
इस्रायल भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम याद वाशेम या स्थळाला भेट दिली. याद वाशेम हे इस्रायलचं ऐतिहासिक स्मारक आहे. दुस-या महायुद्धात नाझींनी हत्याकांड केलेल्या असंख्य ज्यूंना हे स्मारक समर्पित करण्यात आलं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांचं आकर्षक फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी अशी ही अत्यंत मोहक फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी अशी होती. मोदींना ही फुलं भेट दिल्यानंतर, इस्रायलमध्ये या फुलांचं नामकरण मोदी असं करण्यात आलं आहे.
Jul 5, 2017, 10:10 AM IST