पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण
Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain ) नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही सध्या पावसाची शक्यता आहे.
Mar 7, 2023, 03:49 PM ISTMaharashtra Rain : अवकाळी पावसाने झोडपले, पिक भुईसपाट तर बळीराजा पुरता आर्थिक संकटात
Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे.नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mar 7, 2023, 03:07 PM IST