हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
Oct 19, 2014, 07:35 PM ISTदेशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह
दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय.
Oct 19, 2014, 05:40 PM ISTदिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Oct 19, 2014, 06:32 AM ISTएक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.
Oct 15, 2014, 08:08 PM IST