h3n2 patients

गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.

Mar 17, 2023, 07:44 AM IST

H3N2 Outbreak: 'ताप अंगावर काढू नका, उपचार घेतले तरी...', आरोग्यमंत्र्यांकडून खबरदारीचा इशारा!

Tanaji Sawant On H3N2 Outbreak: तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय.

Mar 15, 2023, 04:16 PM IST

महाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय

H3N2 Influenza Virus Death: देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. मुंबई, पुणे शहरानंतर आता नागपूर आणि नगरमध्येही रुग्ण आढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Mar 15, 2023, 07:40 AM IST