नरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर
गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
Dec 20, 2012, 11:35 AM ISTगुजरातमध्ये भाजप ११४ जागांवर आघाडीवर
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली आहे. भाजप ११४ तर काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 20, 2012, 09:47 AM ISTगुजरातमध्ये भाजपला २/3 बहुमत मिळेल – अमित शाह
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे.
Dec 20, 2012, 09:14 AM ISTगुजरातमध्ये उत्साह, ३८ टक्के मतदान
गुजरात विधानसभेच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. दुपारी १ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झालय. ९५जागांसाठी हे मतदान होतय. आज नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
Dec 17, 2012, 02:26 PM ISTगुजरातमध्ये मतदानाला सुरूवात
गुजरातमध्ये आज विधानसभेच्या 95 जागांसाठी मतदान होणार आहे. दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील हे मतदान असणार आहे.
Dec 17, 2012, 08:27 AM ISTगुजरात निवडणूक : मोदींना श्वेता भट्ट देणार टक्कर
गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Nov 30, 2012, 01:32 PM IST