भाजप विरुद्ध भाजप
उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय
Sep 19, 2012, 08:54 PM ISTएनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2012, 09:36 PM ISTखड्ड्यांतून येणार गणपती बाप्पा!
मुंबईत साडेसात हजार हजार खड्डे बुजवण्यात कुचराई करणाऱ्या २४ कंत्राटदारांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली असली तरी ही निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीनं केलाय.
Sep 6, 2012, 11:45 AM ISTगणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेत
गणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
Aug 30, 2012, 04:07 PM ISTबाप्पा आले घरी...
टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.
Aug 22, 2012, 11:45 AM ISTबाप्पा महागले!
गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.
Jul 28, 2012, 11:24 AM IST