dhananjay munde

बीडमध्ये राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार ?

मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार हे नक्की.

Jan 28, 2017, 09:41 AM IST

धनजंय मुंडेंची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका

निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करुन नाव न घेता कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

Dec 11, 2016, 10:19 AM IST

मराठा आरक्षण श्रेयावरून विनोद तावडे - धनजंय मुंडे यांच्यात खडाजंगी

मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Dec 8, 2016, 04:06 PM IST

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे लढाईत धनंजय मुंडेची बाजी

राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ जागांवर भाजपचे आणि सेना, काँग्रेसचे एक-एक उमेदवार आघाडीवर आहेत.

Nov 28, 2016, 01:43 PM IST

पंकजा X धनंजय मुंडेंमध्ये बिग फाईट

पंकजा X धनंजय मुंडेंमध्ये बिग फाईट 

Nov 4, 2016, 09:10 PM IST

पंकजांनी गळाभेट घेत केलं धनंजय मुंडेंचं सांत्वन

बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासहीत प्रज्ञा मुंडे,अजित पवार,निरंजन डावखरे, राजेश टोपे, पाशा पटेल तसंच अनेक आजी - माजी आमदार - मंत्री हजार होते.

Oct 14, 2016, 04:09 PM IST

जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Oct 12, 2016, 05:08 PM IST

भाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली. 

Oct 11, 2016, 07:01 PM IST

भगवान गडाची लढाई

भगवान गडाची लढाई

Oct 8, 2016, 08:37 PM IST