dahihandi

रत्नागिरीत नदीत दहीहंडी

जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गिम्हवी गावात दरवर्षी आगळीवेगळ्या पद्धतीनं दहीहंडी उत्सव साजरा होतो. नदीत दहीहंडी बांधली जाते आणि गावातले गोविंदा ही हंडी फोडण्यासाठी येतात.

Aug 25, 2016, 11:36 PM IST

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Aug 25, 2016, 07:58 PM IST

दहीहंडीबाबत निर्णयाचा मुंबईत अनेक ठिकाणी निषेध

दादारमध्ये अनोख्या पद्धतीनं दहीहंडीचे थर लावण्यात आले. गोविंदा मंडळांनी कोर्टाच्या आदेशांचं पालन करत उंचावर थर न लावता चक्क झोपून थर लावले. 

Aug 25, 2016, 12:39 PM IST

राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 

Aug 24, 2016, 11:32 PM IST

दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Aug 24, 2016, 11:17 PM IST

मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं

ठाणे भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे 

Aug 24, 2016, 07:20 PM IST

दहीहंडीनिमित्त मुंबईकरांना सुटी जाहीर

दहीहंडी सणानिमित्त २५ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तसे राज्य शासनाने परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे.

Aug 23, 2016, 05:25 PM IST

दहीहंडी : न्यायालय निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.

Aug 19, 2016, 11:45 PM IST

दहीहंडी आता काय स्टुलावरुन फोडायची का? : राज ठाकरे

दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का, असा सवाल उपस्थित करुन राज ठाकरे म्हणालेत, प्रत्येकबाबतीत कोर्टाने ढवळाढवळ करु नये. मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का?

Aug 18, 2016, 01:27 PM IST