मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं

ठाणे भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे 

Updated: Aug 25, 2016, 12:04 AM IST
मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं title=

ठाणे : येथील भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे. नऊ थराच्या गोविंदा पथकांच्या स्वागताचे आवाहन करणारे मनसेचे वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवले.

नऊ थर लावायला तुम्ही या, कोर्टाचे आम्ही बघतो असे वादग्रस्त आवाहन या पोस्टरच्या माध्यमातून मनसेनेने करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी ठाणे पोलीस आणि मनपानं कारवाई करुन मनसेचं हे वादग्रस्त पोस्टर हटवले.