congress

फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnataka Election 2023 :  कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  

May 4, 2023, 12:41 PM IST

'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

May 4, 2023, 10:54 AM IST

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

May 4, 2023, 10:10 AM IST

छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...

May 3, 2023, 11:47 AM IST
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President PT1M19S

Sharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?

Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President

May 3, 2023, 11:40 AM IST

'चोमडेगिरी बंद करा', नाना पटोलेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले "चाटुगिरी..."

Nana Patole vs Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patl) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांना चोमडेगिरी बंद करा असं सुनावल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं आहे.

 

May 3, 2023, 11:28 AM IST

महाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा

Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.

May 2, 2023, 12:33 PM IST