commonwealth games

कॉमनवेल्थ 2014: राहीला गोल्ड मेडल, एकूण 15 मेडलची कमाई

कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत  5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 26, 2014, 05:32 PM IST

कॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल

दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 25, 2014, 08:13 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

Jul 24, 2014, 08:10 PM IST

राष्ट्रवादीचे भुजबळ, घोटाळेबाज कलमाडी अडचणीत

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नाशिकचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ अडचणीत आलेत. तर सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Mar 1, 2014, 09:37 AM IST

सबसे बडे खिलाडी कलमाडी येरवड्यात ?

पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.

Dec 22, 2011, 07:43 PM IST