bhandardara dam

अहमदनगरमधील भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं

जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे. अकरा हजार साठ टीएमसी इतकी भंडारदरा धरणाची क्षमता आहे. सध्या भंडारदरा आणि २६ हजार टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. यामुळे या दोन्ही धरणांसह निळवंडे धरणातला पाणीसाठा वेगानं वाढत आहे. तसंच वरुणराजा धोधो कोसळत असल्यानं अकोले तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतून शेकडो प्रपात फेसाळत वाहत आहेत. तर रंधा फॉल, नेकलेस फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वत्र समाधानकारक पाउस पडत असल्यानं उत्तर अहमदनगर भागातल्या शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. तुलनेनं दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात अजूनही पावसानं पाठ फिरवलेली असल्यानं मात्र शेतक-यांत चिंतेचं वातावरण आहे. 

Jul 25, 2017, 09:13 AM IST

विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं

पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 

Dec 8, 2014, 10:31 PM IST

भंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी

तहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.

Oct 21, 2012, 10:30 AM IST