मनसे आमदाराचा पालकमंत्र्यांवर मनमानीचा आरोप
औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
Oct 8, 2012, 10:29 PM IST'सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले महागात पडतील'
सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये बाळासाहेबांची भेट घेऊन चर्चा केली.
May 6, 2012, 05:46 PM ISTनाशकात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोरच हा प्रकार घडला.
Nov 30, 2011, 02:42 AM IST