मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन
Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या.
Nov 22, 2023, 11:23 AM ISTबायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली
डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं.
Mar 23, 2016, 09:20 PM ISTहेडलीच्या साक्षीने मला धक्का बसला : राजाराम रेगे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 01:46 PM IST२६/११ हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर मुख्य टार्गेट, हेडलीचा खळबळजनक गौप्यस्फोट
२६/११हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर हेच मुख्य टार्गेट होते, असा डेव्हिड हेडलीने गौप्यस्फोट साक्षीदरम्यान केलाय.
Feb 9, 2016, 11:28 AM IST२६/११ हल्ल्याला पाच वर्ष, हुतात्मांना श्रद्धांजली
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.
Nov 26, 2013, 01:18 PM IST26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष
26/11हल्ल्यातील NSG शूर कमांडोंकडे सरकारचे दुर्लक्ष केले आहे. कमांडोंना वेळेवर पेन्शन मिळत नाही, माहितीच्या अधिकारात झाले उघड झाले आहे. जखमी NSG कमांडोंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप NSG कमांडो सुरेंद्र सिंग यांनी केला आहे.
Nov 22, 2012, 02:02 PM ISTअशी दिली असावी कसाबला फाशी
२६ / ११चा दहशतवादी कसाबला आज सकाळी साडे सातच्या सुमारास फाशी देण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.
Nov 21, 2012, 02:18 PM ISTकसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....
Nov 21, 2012, 12:02 PM ISTकसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं
भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.
Nov 21, 2012, 11:53 AM IST`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`
कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.
Nov 21, 2012, 10:55 AM ISTमुंबई हल्ल्यातील आणखी एकाला अटक
सौदी अरबमध्ये आणखी एक दहशतवादी ताब्यात घेण्यात आलाय. मेहमूद फसिह असं या दहशतवाद्याचं नाव आहे. मुंबई हल्ल्यासह भारताताली अनेक बॉम्बस्फोटात फसिहचा मुख्य सहभाग असल्याचा संशय आहे. फसिहला सौदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे हालचाली सुरू झाल्यात.
Jul 1, 2012, 02:59 PM ISTमुंबई हल्ल्याचा सूत्रधार आमदार निवासात
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला २६/११ मुंबईतील हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल तथा अबू हामजा हा महाराष्ट्र सरकारमधील आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या निवासस्थानी राहीला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी म्हटले आहे.
Jun 26, 2012, 02:13 PM IST२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला अटक
२६/११ मुंबई हल्ल्यातील एका दहशतवाद्याला आज सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय या दिल्लीच्या विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आज सकाळी या दहशतवाद्याला स्पेशल सेलने पकडले.
Jun 26, 2012, 09:49 AM IST"मला वाचवा हो वाचवा"- सईद
पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन कुठलीही प्रतिकूल कारवाई करू नये, अशी लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिझ सईद याने लाहोर कोर्टाकडे मागणी केली आहे.
Apr 19, 2012, 12:09 AM IST'२६/११' हल्ल्यामागेही लादेन?
अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचाही २६/११च्या मुंबई हल्ल्यामध्ये महत्वाचा सहभाग होता. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता, तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले होते.
Apr 4, 2012, 09:33 AM IST