www.24taas.com, मुंबई
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवादी करण्यात आला होता. कसाबने दयेचा अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले. त्यामुळे कसाबला कधी फाशी देणार आणि कुठे फाशी देण्यात येणार असे प्रश्न उपस्थित होत होते.
पण, काही वेळातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कसाबला येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आल्याची माहिती दिली.
‘मुंबई हल्ल्यातील दोषी कसाबला फासावर दिल्यानं आपल्याला आनंदच झालाय... यालाही दोन कारणं आहेत... पहिलं म्हणजे मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळालाय आणि दुसरा म्हणजे आपण दहशतवाद्यांना या माध्यमातून कठोर संदेशही दिलाय’ अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलीय.
कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय. अजमल कसाबनंतर आता अफजल गुरुच्या फाशीवरही लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावं, अशी मागणी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलीय.
तुम्हांला काय वाटते... मांडा तुमचं रोखठोक मत.... कसाबला फाशी देण्यात विलंब झाला का, आता संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूलाही फाशी देण्यात यावी का, याबाबत मांडा आपलं मत... खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रतिक्रिया.... तुमच्या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील आमच्या विशेष कार्यक्रमात.