होळी

होळीची विविध रुपं !

कुठं पुरुषांना खावा लागतो महिलांचा मार ? कुठं आजही पहायला मिळतो शंकासूरचा खेळ ? कुठं साजरी केली जाते लाकडाविना होळी ?

Mar 28, 2013, 12:08 AM IST

सदाशिव अमरापूरकरांना 'रंगील्यांची' शिविगाळ

अभिनेते सदाशिव अमरापूरकरांना शिविगाळ झाल्याची घटना मुंबईतल्या वर्सोव्यात घडली आहे. वर्सोव्यातील पंचवटी सोसायटीत हा प्रकार घडला.

Mar 27, 2013, 10:32 PM IST

रुढींची होळी, चळवळीची पुरणपोळी!

होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

Mar 27, 2013, 07:14 PM IST

कोकणात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी

कोकणात मंगळवारपासून होळीच्या सणाला सुरुवात झालीय. पारंपरिक पद्धतीनं साज-या होणा-या कोकणातल्या होळी साजरी करण्यात आली.

Mar 27, 2013, 04:50 PM IST

होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!

राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..

Mar 27, 2013, 01:59 PM IST

रंगाचा बेरंग !

काही लोक पैशांसाठी घातक रसायनयुक्त रंगाची विक्री करतात

Mar 26, 2013, 11:48 PM IST

प्रेत जाळण्याची लाकडं होळीसाठी

`झी २४ तास`ने होळीच्या पार्श्वभूमीवर एक पर्दाफाश केला आहे. प्रेत जाळण्यासाठी असणाऱ्या सरणावरच्या लाकडावरही डल्ला मारला जातोय.

Mar 26, 2013, 04:44 PM IST

होळीच्या रंगापासून बचाव करण्यासाठी काय कराल?

होळी स्पेशलः होळीच्या निमित्ताने तुमच्या त्वेचेची काळजी घेण्यासाठी काही विशेष टिप्स
होळी, रंगाची चौफेर उधळण करणारा सण उद्यावर येऊन ठेपला आहे.परंतु हेच रंग तुमच्या त्वचेची आणि केसांची हानी करु शकतात.आम्ही तुमच्यासाठी काही विशेष टिप्स घेऊन आलोय जेणेकरुन तुमची ही होळी सुरक्षित आणि आनंदात साजरी होईल.

Mar 26, 2013, 02:25 PM IST

सावधान! फुगे माराल तर रंगाचा बेरंग...

तुम्ही होळी खेळत असाल तर सावधान.... ‘होळी रे होळी... पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी खेळली जाते. पण हे करीत असताना सावधान राहिले पाहिजे! रंगाचा बेरंग होईल. कारण धावत्या लोकलवर किंवा महिलांवर पाण्याने भरलेले फुगे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या माराल तर तुमची होळी बिन भाड्याच्या खोलीत म्हणजे जेलमध्ये काढावी लागेल.

Mar 25, 2013, 11:28 AM IST

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Mar 23, 2013, 09:36 PM IST

बापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे

आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.

Mar 19, 2013, 07:05 PM IST

रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

Mar 10, 2012, 03:33 PM IST

रंग खेळताना घ्या त्वचेची काळजी

रंगपंचमीचा सण म्हणजे धुळवड होणारच. मात्र रंगांची उधळण होताना या रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण, रासायनिक रंग त्वचेला तसंच डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकतात.

Mar 8, 2012, 11:24 AM IST

होळीनिमित्त दारूची तस्करी

होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.

Mar 8, 2012, 08:57 AM IST

बालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी

होळी खेळताना रासायनिक रंगाचा वाढता वापर आणि त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कोल्हापुरातल्या ‘बालकल्याण संकुला’तल्या मुलांनी नैसर्गिक रंगांची होळी खेळली.

Mar 8, 2012, 08:19 AM IST