हिंसाचार

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा हिंसाचार सुरुच, 30 ठार

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 30 नागरिक ठार झाले आहेत. यातील 12 मृतदेह बक्सा जिल्ह्यात आढळले आहेत. या हल्ल्यानंतर क्रोक्राझार, चिरंग आणि बाक्सा या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

May 3, 2014, 10:37 AM IST

जातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.

Dec 5, 2013, 04:05 PM IST

संसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!

काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.

Aug 12, 2013, 02:42 PM IST

हिंसाचाराची बनावट क्लिप; दोघांना अटक

आसाम आणि म्यानमार हिंसाचाराची बनावट व्हिडिओ क्लिप ‘ब्लू टूथ’च्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन समाजकंटकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 20, 2012, 09:52 AM IST

आसाममध्ये दंगलीचा भडका कायम; ४१ ठार

आसाममध्ये दंगलीचं सत्र पेटलंय. आत्तापर्यंत या दंगलीत ४१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. जवळजवळ दोन लाख लोक बेघर झालेत अनेक जण बेपत्ता आहेत, अनेक गावं आगीत भस्मसात झाली आहेत आणि हजारो जणांना आपलं घराला पारखं व्हावं लागलंय.

Jul 26, 2012, 01:43 PM IST

हिंसाचाराचा दुष्परिणाम होतो 'सेक्स'वर

गुन्हेगारी, शिवीगाळ आणि हिंसाचार वाट्याला आलेल्या स्त्रियांमध्ये सेक्सबद्दल एक प्रकारची रानटी भावना निर्माण होते. यामुळेच अशा स्त्रियांना एड्स होणयाचं किंवा अकाली गर्भार राहाण्याचं प्रमाण वाढतं.

Jul 4, 2012, 06:51 PM IST

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. याला निमित्त होते ते राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे भाषण. या हिंसाचारामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याने वातावरण बिघडले आहे. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

Mar 2, 2012, 12:05 PM IST