सिंधुदुर्ग

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली

कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.

Mar 1, 2017, 04:22 PM IST

सिंधुदुर्गात शिवसेना- भाजप युतीचा नारळ फुटणार

महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणारे शिवसेना आणि भाजप आता पुन्हा एकत्र येतील का अशी चिन्ह दिसू लागले आहेत. मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी युती होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. स्थानिक पातळीवर सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून निवडून आलेले सदस्यांनी काँग्रेसमध्ये जावू नये म्हणून शिवसेना आणि भाजपने काही ठिकाणी वैयक्तिक स्तरावर युती केली आहे. देवगड, वैभववाडी आणि वेंगुर्ला या पंचायत समित्यांसाठी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून गट स्थापन करण्यात आले आहेत.

Feb 28, 2017, 04:11 PM IST

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

Dec 26, 2016, 06:28 PM IST

आंगणेवाडीची जत्रा यंदा 2 मार्चला

सिंधुदुर्गमधील महत्वाची आणि प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यंदा 2 मार्चला होणार आहे. प्रति पंढरपूर नावाने आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध आहे. 

Dec 8, 2016, 09:54 AM IST

सिंधुदुर्गात मिनी कुंभमेळ्याचं आयोजन

सिंधुदुर्गात मिनी कुंभमेळ्याचं आयोजन

Dec 2, 2016, 09:31 PM IST

हा माझा कमबॅक नाही, मी आहे तिथेच - नारायण राणे

 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना-भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, नोटबंदी, वाढती महागाई, अशा अनेक विषयांवर लोकांमध्ये रोष असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलंय. 

Nov 28, 2016, 04:31 PM IST