सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

Updated: Dec 26, 2016, 06:28 PM IST
सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन title=

सिंधुदुर्ग : शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

निवडणुकीपूर्वी शिवसेना, भाजपने कोकणातील मच्छिमारांना वारेमाप आश्वासनं दिली होती. प्रत्यक्षात मात्र कोणतीही आश्वासनपूर्ती झाली नाही याच्याच निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आलं आहे. आज वेंगुर्ला येथून शेकडी मच्छिमार समुद्रात गेले. या ठिकाणी त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.