सरकारी हॉस्पिटल

सरकारी हॉस्पिटलचा भोंगळ कारभार, चुकीच्या इंजेक्शनमुळं 18 मुलं गंभीर

भिवंडीच्या सरकारी रुग्णालयात १८ मुलांना चुकीच्या इंजेक्शनची बाधा झालीय. रविवारी रात्री भिवंडीच्या इंदिरा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयात १८ मुलांना देण्यात आलेल्या अॅमिकासीन या इंजेक्शनची रिअॅक्शन झाल्याची घटना घडली. मुलांना त्रास होवू लागल्यानं पालकांमध्ये भीती पसरली होती. मात्र डॉक्टरांनी तत्काळ कॉन्ट्रन्स इंजेक्शन देत परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 

Aug 3, 2014, 09:23 PM IST

सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पळवापळवी!

नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.

Mar 13, 2013, 06:07 PM IST