सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची पळवापळवी!

नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 13, 2013, 06:07 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची चक्क पळवापळवी सुरू आहे. रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पळवून नेणा-या दलालांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. प्रसंगी मृत्यूची भीती दाखवून हे दलाल रुग्णांना पळवून नेत होते.
आशिया खंडातलं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय म्हणून नागपूरचं शासकीय रुग्णालय ओळखलं जातं. सुमारे दहा हजार रुग्ण रोज या हॉस्पिटलमध्ये येतात. पण याच हॉस्पिटलमध्ये सध्या सुरू आहे रुग्णांची पळवापळवी..... बाहेरच्या जिल्ह्यातून येणा-या रुग्णांवर हॉस्पिटलमधल्या दलालांची नजर असते. या हॉस्पिटलमध्ये उपचार चांगले होणार नाहीत, असं सांगत दलाल रुग्णांना खाजगी डॉक्टरकडे घेऊन जातात.

याप्रकरणी २ दलालांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या रुग्णालय प्रशासनानं आता उपाययोजना करायला सुरुवात केलीय. ही घटना उघड झाल्यावर रुग्णालय प्रशासनानं कारवाई सुरू केलीय. पण इतके दिवस रुग्णालय प्रशासन काय करत होतं, हा प्रश्न आहे...