शेतकरी

या सरकारच्या काळात देव सुखी, मात्र माणसे नाही - राजू शेट्टी

देवधर्मासाठी सरकारकडे निधी आहे, परंतु, माणसांसाठी नाही, शासनाच्या तिजोरीतील ४० हजार कोटी रुपये या सरकारने देवधर्मासाठी खर्च केले. या सरकारच्या काळात देव सुखी आहे पण माणसे नाहीत, असा घणाघाती हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केलाय.

Sep 27, 2017, 07:44 AM IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Sep 27, 2017, 07:37 AM IST

पाच वर्षानंतरही मोबदला न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

बदलापूर - वांगणी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करीत असताना या भागातील शेतकऱ्यांची भूसंपादन करून पाच वर्ष झाली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या भूसंपादन प्रक्रियेत फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांची झाली असून मोबदल्यापासून वंचित असलेले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Sep 24, 2017, 04:43 PM IST

योगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.  

Sep 19, 2017, 01:22 PM IST

कृषी पंपाला वीज जोडणी केलेली नसतानाही पाठवलं वीज बील

वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला.

Sep 17, 2017, 11:07 PM IST

शेतकऱ्यांना दर द्यायला खाजगी दूध उत्पादकांचा नकार

राज्य सरकारनं शेतक-यांच्या दुधाला २७ रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश दिले असले तरी, हा दर द्यायला खाजगी दूध उत्पादक तयार नाहीत. 

Sep 17, 2017, 10:06 PM IST