टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये भारताला खुशखबर
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताला खुशखबर मिळाली. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने तर बॅडमिंटनध्ये सायना नेहवाल यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला. बॅडमिंटमध्ये सायना नेहवालने श्रीलंकेच्या दिलरुक्षी बेरुवेलगेला २१-८, २१-४ असे हरवले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेला ३-० अशी मात दिली. ऑक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सलग तीम सामने जिंकले तर इतर दोन सामने खेळण्याच गरज पडली नाही.
Apr 5, 2018, 09:14 AM IST