गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारताला खुशखबर मिळाली. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने तर बॅडमिंटनध्ये सायना नेहवाल यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला. बॅडमिंटमध्ये सायना नेहवालने श्रीलंकेच्या दिलरुक्षी बेरुवेलगेला २१-८, २१-४ असे हरवले. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी श्रीलंकेला ३-० अशी मात दिली. ऑक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सलग तीम सामने जिंकले तर इतर दोन सामने खेळण्याच गरज पडली नाही.
पहिल्या सामन्यात भारताच्या मनिका बत्राने श्रीलंकेच्या इरंद्र वारुसाविथानला ११-३, ११-५, ११-३ अशी मात देत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसरा सामन्यात भारताच्या सुत्र्थिा मुखर्जीने ११-५, ११-८,११-४ असा विजय मिळवत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मुखर्जीने यानंतर पूजा सहस्त्रबुद्धेसह खेळताना भारताला तिसरा विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलेवहिले पदक जिंकूम दिले. वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराजाने रौप्यपदक मिळवले. त्याने ५६ किलो वजनी गटात हे पदक मिळवले.
भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.