‘नवऱ्यांनो शौचालयं बांधून द्या, नाहीतर उपाशी राहा’ असा इशारा दिलाय बुलढाण्यातल्या दिवठाना गावातल्या महिलांनी... महिलांनी ग्रामसभेत यासंदर्भातला ठराव पारीत केला.
कचऱ्याच्या प्रस्तावावरून पालिकेचा 'कचरा'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय.
`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय.
भारतीय हवाई दलाची शौर्यगाथा
पुणे ते तामिळनाडू प्रवास केवळ ३६ तासात...
रेल्वे.. दोन गावांना, शहरांना जोडणारी...कोट्यवधी लोकांना एकडून तिकडे पोहोचवणारी.. मालाची वाहतूक करणारी... मात्र दौंडची ट्रेन मात्र वेगळी आहे.
जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.
औरंगाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीने 2012-13 या वर्षाच्या योजनेत 66 कोटी रुपयांच्या कामांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा आरोप मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी मनमानी करत निधीचे वाटप करीत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. याविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.