मोदी

भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्या वतीनं त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले. जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय.  त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jul 11, 2017, 02:02 PM IST

इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.

Jul 5, 2017, 12:54 PM IST

इस्राईलने मोदींच्या सन्मानात फुलाचं नाव ठेवलं 'मोदी'

इस्रायल भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम याद वाशेम या स्थळाला भेट दिली. याद वाशेम हे इस्रायलचं ऐतिहासिक स्मारक आहे. दुस-या महायुद्धात नाझींनी हत्याकांड केलेल्या असंख्य ज्यूंना हे स्मारक समर्पित करण्यात आलं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी यांचं आकर्षक फुलांचा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी अशी ही अत्यंत मोहक फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी अशी होती. मोदींना ही फुलं भेट दिल्यानंतर, इस्रायलमध्ये या फुलांचं नामकरण मोदी असं करण्यात आलं आहे. 

Jul 5, 2017, 10:10 AM IST

मोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.

Jul 5, 2017, 09:50 AM IST

इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींच्या योग प्रसाराची केली तोंडभरून स्तुती

 इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नित्यान्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंडभरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मार्थ दिलेल्या डिनरच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नित्यान्याहू यांनी मोदी हे त्याच्यांसाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केल. याशिवाय भारत-इस्त्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली. तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.

Jul 5, 2017, 09:38 AM IST

पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

Jul 5, 2017, 09:19 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्राईलमध्ये होणार भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सवा दहा वाजता दिल्लीहून ते इस्राईलसाठी रवाना होणार आहेत. गेल्या 70 वर्षात इस्राईलचा दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान आता भारत खंबीरपणे इंस्राईलशी संबंध जगासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक असणार आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील कुटनिती संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या 25 वर्षामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Jul 4, 2017, 09:12 AM IST

मोदींच्या इस्राईल दौऱ्यात गायिका लेआरा इत्झेक गाणार राष्ट्रगीत

मुळची भारतीय आणि इस्रायलची गायिका लेआरा इत्झेक 4 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौ-यावर भारत आणि इस्रायलचे राष्ट्रगीत गाणार आहे.

Jul 3, 2017, 11:26 AM IST

सोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प

अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.  

Jun 27, 2017, 05:14 PM IST

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं गेले.

Jun 27, 2017, 05:00 PM IST