मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता
मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 12, 2013, 04:57 PM ISTपावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द
मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
Jul 12, 2013, 03:03 PM ISTपावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर
मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.
Jun 17, 2013, 09:31 AM ISTपावसाने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
Jun 10, 2013, 10:18 AM ISTठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम
राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.
Jun 10, 2013, 07:53 AM IST