यासिनला महाराष्ट्रात आणणार?
यासिन भटकळची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचं पथक रवाना झालंय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिलीय. यासिन भटकळ हा वॉन्टेड अतिरेकी आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची नोंद आहे.
Aug 29, 2013, 09:03 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM ISTसरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.
Aug 22, 2013, 09:15 AM ISTबापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे
आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.
Mar 19, 2013, 07:05 PM ISTराज्यसरकारकडून विद्यार्थ्यांना ‘गुड’न्यूज!
होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.
Feb 13, 2013, 10:19 AM ISTधमकीच्या ई-मेलनंतर राज्यात ‘हाय अलर्ट’
देशभरात स्फोट घडवून तीन हजार लोकांना उडवून देऊ, आम्ही रांचीमध्ये पोहोचलो आहोत, असा धमकीचा ई-मेल आल्यानंतर झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणेला ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.
Dec 10, 2012, 04:10 PM ISTदिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?
उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.
May 25, 2012, 04:45 PM ISTपुणे महापालिका करणार अण्णांचा सत्कार
पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.
Nov 9, 2011, 11:03 AM IST