बेळगाव महापालिका

कानडी दडपशाहीचा एकमुखी निषेध

बेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पण, मनसे गटनेत्यांनी मात्र, या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांना केलीय.

Jul 13, 2012, 09:47 AM IST

सीमावासियांच्या पाठिशी शिवसेना - ठाकरे

आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं.

Jul 8, 2012, 06:05 PM IST

'मराठीविरोधी कर्नाटक सरकार... हाय हाय!'

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका आज पुन्हा एकदा बरखास्त केलीय. याआधीही सरकारनं बरखास्तीचा निर्णय घेतला होता, पण कोर्टानं ही बरखास्ती अवैध ठरवत चपराक दिली होती. तरीही मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची नोटीस दिलीय.

Jul 3, 2012, 05:48 PM IST