www.24taas.com, बेळगाव
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका आज पुन्हा एकदा बरखास्त केलीय. याआधीही सरकारनं बरखास्तीचा निर्णय घेतला होता, पण कोर्टानं ही बरखास्ती अवैध ठरवत कर्नाटक सरकारला चपराक दिली होती. तरीही मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची नोटीस दिलीय.
२० डिसेंबर २०११ रोजी कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिका बरखास्त केली होती. या निर्णयाविरोधात मराठी भाषिक नगरसेवकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यावर १९ जून रोजी बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा निर्णय हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठानं रद्दबातल ठरवून कानडी दडपशाहीला चपराक लगावली होती. तरिही या महिन्यात पुन्हा एकदा बेळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर माजी महापौर मंदा बाळेकुंद्री यांनी कठोर शब्दांत टीका केलीय. मराठी वर्चस्व असलेल्या महापालिकेला सूडबुद्धीनं वागणूक दिली केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतेय.
सीमावासिय मराठी भाषकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा इरादा या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.
व्हिडिओ पाहण्यासाठी -
http://zeenews.india.com/marathi/?p=131982
.