फिफा

बेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक

 

नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे. 

Jul 6, 2014, 07:09 PM IST

क्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?

ब्राझिलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा सणसणाटी आरोप करण्यात आलाय.  

Jul 1, 2014, 09:49 PM IST

फिफा 2014 : उरुग्वेसमोर सुआरेझविना मैदानात उतरणार कोलम्बिया

 

मुंबई : उरुग्वे आणि कोलम्बियामधील रंगतदार मुकाबल्याची ट्रीट फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या स्टार स्ट्रायकरविना मैदानात उतरणार आहेत. लुईस सुआरेझ खेळणार नसल्यानं उरुग्वेच्या टीमला मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी टीम आपल्या स्ट्रायकरविना सर्वोत्तम खेळ करेल तिच टीम क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल.  

Jun 28, 2014, 08:34 AM IST

फिफा वर्ल्डकप 2014 : एक नजर ‘प्री क्वार्टर’ लढतींवर…

 

कुरितिबा (ब्राझील) : फुटबॉल वर्ल्ड कपमधून आणखी एका टॉप टीमला आपला गाशा गुंडाळावा लागला. पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं. कॅप्टन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वर्ल्ड कपमध्ये गोल झळकावला. मात्र, त्याला आपल्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश मिळवून देता आला नाही.

Jun 27, 2014, 11:39 AM IST

फिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं

 पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.  

Jun 27, 2014, 11:27 AM IST

सुआरेजनं माझ्या खांद्याचा चावा घेतला - चिलिनी

इटलीचा डिफेंडर जार्जियो चिलिनीनं म्हटलं, की  उरुग्वेचा स्ट्राइकर लुई सुआरेजनं वर्ल्डकप ग्रुप डी मॅच दरम्यान त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता.    

 

Jun 25, 2014, 12:57 PM IST

वर्ल्डकप 2014 : नेदरलँडची चिलीवर धडाकेबाज मात

ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. नेदरलँड्सने चिलीवर 2-1नं विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखलंय तर दोन विजय मिळवणारी चिली दुसऱ्या स्थानी आहे.

Jun 24, 2014, 09:16 AM IST

फिफा 2014 : कोस्टा रिकाकडून इटली 1-0ने पराभूत

फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेनच्या पाडावानंतर इटलीलाही पराभवाच तोंड पहावं लागलं. वर्ल्ड कपमधील हा दुसरा मोठा अप सेट ठरला.

Jun 21, 2014, 08:08 AM IST

या खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`

सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात.
त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.

Jun 16, 2014, 01:01 PM IST

‘फिफा` वर्ल्डकप 2014 मध्ये आज...

वर्ल्ड कपमध्ये स्टार स्टडेड मॅच रंगणार आहे ती इंग्लंड आणि इटलीमध्ये… वेन रूनी, स्टिव्हन जेरार्ड, मारियो बालोटेली आणि आंद्रेय पिर्लो हे चार फुटबॉलपटू या मॅचेमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे.

Jun 14, 2014, 06:33 PM IST

गूगलचं ‘डुडल’ही घेतंय फिफा वर्ल्डकपचा आनंद!

फिफा वर्ल्डकप २०१४ सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या फूटबॉल वेड्यांची प्रतिक्षा आता संपलीय. लहान- मुलांपासून मोठयापर्यत फिफा वर्ल्डकपसाठीची उत्सुकता दिसून येतेयं.

Jun 12, 2014, 06:51 PM IST

स्कूटरवरून लंडन ते ब्राझील... ऑल फॉर फूटबॉल

‘इंग्लंड फूटबॉल टीम’चा एका चाहत्यानं लंडन ते ब्राझील असं जवळजवळ 24,000 किलोमीटरचा प्रवास आपल्या वेस्पा स्कूटरवर बसून केलाय

Jun 11, 2014, 02:45 PM IST

एचडी कॅमेऱ्यावर पाहा `ब्राझुका`चे दण दणा दण गोल!

फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहचलाय. या वर्ल्ड कपसाठी वापरण्यात येणारा बॉल कसा असेल? याबाबतही फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे.

Jun 6, 2014, 10:15 AM IST

फुटबॉल वर्ल्डकपवर ब्राझीलकर नाराज

अवघ्या एका महिन्यावर आलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची सगळेच फुटबॉल प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागतंय. तसेच या समस्यांचे खापर वर्ल्डकपला होणारा ११ अब्ज डॉलरच्या खर्चावर फोडलं जातोय. याबाबतची खंत `फिफा`चे महासचिव जेरॉम वॅल्की यांनी `फिफा`च्या वेबसाइटवरुन व्यक्त केलंय.

May 14, 2014, 05:50 PM IST