या खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`

सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात. त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.

Updated: Jun 16, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात.
त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.
`शादी डॉट कॉम`च्या आधारावर सर्व्हे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये विचारण्यात आलं की, ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधला आवडता खेळाडू कोण ? त्यावेळी 59.6 % उत्तर हे मेस्सी म्हणून देण्यात आले.
मेस्सीनंतर नंबर लागला, तो पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोचा, त्याला भारतीय मुलींची 53.4% पसंती मिळालीय, तर मॅचेस्टर युनायटेडचा वेन रुनीनं 51.5% आपले तिसरे स्थान पटकावले.

फिफा 2014 मधील खेळांडू व्यतिरिक्त विवाहीत खेळांडूबद्दल विचारल्यास इंग्लंडचा माजी खेळाडू डॅविड बॅकहमला 48.2% महिलांची पसंती मिळाली. त्याशिवाय त्याची पत्नी विक्टोरिया आणि त्याच्या जोडीला नंबर 1 सेलिब्रेटी जोडी म्हणून मानले जातेय.
बॅकहम आणि विक्टोरियाच्या जोडीनंतर शकीरा आणि गेरार्ड पिके या जोडीला 2 क्रमांकाची आवडती जोडी, तर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि इरिना शाक यांनी जगातील फुटबॉल जगतातील फेवरेट जोडीमध्ये नंबर लावलाय.
सर्वे करताना 39.5% महिलांना फिफा फुटबॉल वर्ल्डकप बघायला आवडतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.