www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. नेदरलँड्सने चिलीवर 2-1नं विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखलंय तर दोन विजय मिळवणारी चिली दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या दोन्हीही लढतींमध्ये जबरदस्त कामगिरीच प्रदर्शन करणाऱ्या ऑरेंज आर्मीला तिसऱ्या मुकाबल्यात चिलीने कडवी टक्कर दिली. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये गोल करत नेदरलँड्सने चिलीवर अखेर विजय मिळवला. चिलीने गत उपविजेत्या नेदरलँड्सला केवळ झुंजच दिली नाही तर त्यांना गोल करण्यासाठीही संघर्ष करायला भाग पाडलं. पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. सेकंड हाफमध्ये नेदरलँड्सकडून 75 व्या मिनिटाला वेस्ले स्नीडरच्या जागी सबस्टीट्यूड म्हणून ग्राऊंडवर उतरवलेल्या लेरॉय फेररने ग्राऊंडवर एन्ट्री घेतल्यानंतर दोन मिनिटांमध्येच गोल करत ऑरेंज आर्मीला पहिल यश मिळवून दिलं. डेरिल जॅनमॉच्या कॉर्नर शॉटवर फेरने हेडरद्वारे बॉलला थेट गोलपोस्टचा रस्ता दाखवला. नेदरलँड्ससाठी दुसरा गोल इंज्युरी टाईममध्ये मेम्फिस डिपेने केला. अर्जेन रोब्बेनच्या एका लाजवाब पासवर मेम्पिनने हा गोल केला. रोब्बनेला जरी एकही गोल करता आला नसला तरी त्याच्या जबरदस्त पासमुळे तोही हिरो ठरला. चिलीवर 2-0ने विजय मिळवणाऱ्या नेदरलँड्सने 9 पॉईंट्सची कमाई केलीय तर या पराभवामुळे आता ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या चिलीचा नॉक आऊटमध्ये बलाढ्य ब्राझिलशी मुकाबला होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.