टोल नाके बंदचा निर्णय हे मनसेचे यश - दरेकर
राज्य सरकारच्या टोल नाके बंद करण्याच्या निर्णय हे मनसेच्या आंदोलनाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी दिलीय.. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं म्हटलंय.
Jun 10, 2014, 08:05 AM ISTबँकेत ४१२ कोटींचा घोटाळा, मनसे आमदार अडचणीत?
‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.
Oct 2, 2013, 08:40 PM ISTभगवती हॉस्पिटलला 'मनसे'चा इशारा
मुंबई उपनगरातील बोरिवलीतल्या महानगरपालिकेच्या भगवती हॉस्पिटलवर मनसेनं मोर्चा नेऊन वैद्यकिय अधिका-यांना घेराव घालून मनसे स्टाईलनं निवेदन दिलं. इथल्या सर्जिकल विभागात एकही डॉक्टर नसल्यामुळं गेल्या दोन महिन्यांत हॉस्पीटलमध्ये एकही ऑपरेशन झालेलं नाही.
May 9, 2012, 12:00 AM IST