पाणीटंचाई

राज्यावर पाणीटंचाई आणि भारनियमनाचे संकट

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. पाणीटंचाईबरोबर भारनियमनावर मोठा परिणाम होणार आहे.

Jun 21, 2017, 04:07 PM IST

580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई, पाण्यासाठी पायपीट

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.

May 6, 2017, 08:05 PM IST

कल्याण महापालिकेतील २७ गावे, दिव्याची पाणीटंचाई दूर होणार

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील २७ गावे व दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाईची दखल घेऊन २७ गावांकरता २५ एमएलडी व दिवा भागाकरता १० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी येथे घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.

May 3, 2017, 07:11 PM IST

एप्रिलमध्येच पाणीटंचाई... तरुणाचा मृत्यू

पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची बिकट परिस्थिती उद्भवलीय. 

Apr 13, 2017, 09:59 PM IST