पंतप्रधान मनमोहन सिंग

लोकपाल विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

कॅबिनेटने दोन तासांच्या विशेष बैठकीनंतर लोकपाल विधेयकाला मंजूरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अण्णा हजारेंच्या मागणीला नकार देत लोकपालच्या कक्षेतून सीबीआयला वगळण्यात आलं आहे.

Dec 20, 2011, 04:17 PM IST

लोकपाल संदर्भात सर्व पक्षीय बैठक निष्फळ

लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय असा प्रश्न या बैठकीत विचारला.

Dec 14, 2011, 06:26 PM IST

'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत गिलानी यांचा समाचार घेतला आहे. 'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही' अशा भाषेत 'गिलानी' यांना भारत आता कोणाताही 'गलथानपणा' करणार नाही हेच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Nov 13, 2011, 05:16 AM IST