लोकपाल संदर्भात सर्व पक्षीय बैठक निष्फळ

लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय असा प्रश्न या बैठकीत विचारला.

Updated: Dec 14, 2011, 06:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय असा प्रश्न या बैठकीत विचारला. कनिष्ठ कर्मचा-यांच्या मुद्द्यावरही बैठकीत मतभेद समोर आले. सीबीआय आणि पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत यावेत, अशी मागणी भाजप आणि डाव्यांनी केली तर पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत नको, अशी भूमिका रामविलास पासवान यांनी घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच लोकपाल बिल याच अधिवेशनात सर्वसहमतीनं मंजूर व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.

 

सर्व पक्षांनी पक्षीय राजकारणावर जाऊन या मुद्द्याचा विचार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केला आहे.  लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय, असा प्रश्न या बैठकीत विचारला. कनिष्ठ कर्मचा-यांच्या मुद्द्यावरही बैठकीत मतभेद समोर आले. सीबीआय आणि पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत यावेत, अशी मागणी भाजप आणि डाव्यांनी केलीय. तर पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत नको, अशी भूमिका रामविलास पासवान यांनी घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच लोकपाल बिल याच अधिवेशनात सर्वसहमतीनं मंजूर व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. सर्व पक्षांनी पक्षीय राजकारणावर जाऊन या मुद्द्याचा विचार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.