हरतो पण लढतो... १६०व्यांदा निवडणूक आखाड्यात!
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... याच व्यक्तींना कोणतेही छंद असू शकतात. असाच एक छंद जोपासलाय के. पद्मराजन के. कुचुंबा या व्यक्तीनं. त्यांना हौस आहे ती देशातील दिग्गज व्यक्तींविरोधात निवडणूक लढविण्याची.
Sep 23, 2014, 04:20 PM ISTमुख्यमंत्री जयललितांकडून धोतर नेसणाऱ्यांना दिलासा
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेत म्हटलं आहे की, लवकरच खासगी क्लबमध्ये धोतर नेसून येणाऱ्या लोकांना प्रवेश देण्याचा कायदा संमत करण्यात येईल.
Jul 16, 2014, 02:36 PM ISTखूर्चीचा किस्सा: जिथे-जिथे जयललिता तिथे त्यांची खूर्ची
राजकारणात नेत्यांचं आपल्या खूर्चीवर किती प्रेम असतं हे आपल्याला माहितीय. अनेक नेते असे आहेत की जे एकदा खूर्चीवर बसले की उठायचं नाव घेत नाहीत. मात्र आम्ही अशा राजकीय खूर्चीबद्दल सांगतोय, ज्यात थोडा ट्वीस्ट आहे.
Jun 11, 2014, 03:30 PM ISTतिकीट मागितले तर कंडक्टरला जिवंत जाळले
तामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात तझयुतू मध्ये चार गुंडांनी तिकीट मागणाऱ्या एका कंडक्टरला जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी कंडक्टरला जीवंत जाळल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आले आहे. भाजलेल्या अवस्थेत कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
May 21, 2014, 06:20 PM ISTराजीव गांधी मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती कायम
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून संविधान पिठाकडे वर्ग करण्यात आले आहे. संविधान पिठाच्या निर्णयापर्यंत मारेकरी तुरुंगातच राहणार आहेत.
Apr 25, 2014, 11:39 AM ISTतामिळनाडू : सत्तापालट होणार?
स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...
Apr 4, 2014, 11:10 PM ISTराजीव गांधी हत्या : मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चार मारेकऱ्यांच्या सुटकेला आज सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती दिली. या स्थगितीमुळे जयललिता सरकारला मोठी चपराक बसली आहे.
Feb 27, 2014, 11:55 AM ISTराजीव गांधींचे मारेकरी तीन दिवसांत मुक्त होणार?
सुप्रीम कोर्टानं फाशी रद्द केल्यानंतर आता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवरून जोरदार राजकारण सुरु झालंय. राजीव गांधी हत्याप्रकरणातील सात मारेकऱ्यांची सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा काल सुनावली होती. हा निर्णय झाल्यानंतर आज तामिळनाडू सरकारने सात मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 19, 2014, 05:56 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश
तामिळनाडू सरकारने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 19, 2014, 11:02 AM IST`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू
`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.
Jan 31, 2014, 11:00 AM ISTप्राण सोडता सोडता `त्या`ने वाचवला ४० जणांचा जीव!
तामिळनाडूमधल्या उधगमंडलममध्ये अनेकांना चकीत करणारी एक घटना घडलीय. आपला जीव गमावणाऱ्या बस ड्रायव्हरनं प्राण सोडता सोडता बसमधल्या ४० प्रवाशांचे जीव मात्र वाचवले.
Aug 14, 2013, 11:20 AM ISTधक्कादायक... ८० वर्षीय महिलेवर बलात्कार!
तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. ४१ वर्षीय व्यक्तीनं ८० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. या महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय.
May 11, 2013, 07:32 PM ISTकुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील
तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भविष्यातील ऊर्जा गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्तवाचा असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.
May 6, 2013, 01:37 PM ISTएक्सप्रेस घसरली; चार ठार, ५० जखमी
तामिळनाडूत मुजफ्फरपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली. या दुर्घटनेत चार जण ठार तर २४ जण जखमी झालेत. तामिळनाडूतील आराकोरमच्या चितेरी स्थानकात ही दुर्घटना घडलीय.
Apr 10, 2013, 10:26 AM IST`श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता देण्याचा ठराव `
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.
Mar 27, 2013, 04:28 PM IST