www.24taas.com, झी मीडिया, उधगमंडलम
तामिळनाडूमधल्या उधगमंडलममध्ये अनेकांना चकीत करणारी एक घटना घडलीय. आपला जीव गमावणाऱ्या बस ड्रायव्हरनं प्राण सोडता सोडता बसमधल्या ४० प्रवाशांचे जीव मात्र वाचवले.
५२ वर्षीय चालक रामासामी स्थानिक सरकारी बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालला होता. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती... उधगमंडलमहून २५ किलोमीटर दूर बुरलियारमधल्या घाट रोडवर आल्यानंतर मात्र अचानाक रामासामीच्या छातीत दुखू लागलं. आपल्याला हृदयविकाराचा धक्का असल्याचं त्याला जाणवलं. छातीत तीव्र कळा येत असतानाही रामासामीनं बस रस्त्याच्या बाजुला उभी केली. यानंतर लगेचच त्याच्या छातीत तीव्र कळ आली... तो स्टिअरिंगवर कोसळला आणि त्यानं प्राण सोडला.
बस सुरू असतानाच रामासामीचा प्राण गेला असता तर ४० प्रवाशांना त्याची किंमत चुकवावी लागली असती, परंतु असं घडलं नाही. रामासामीनं वेळेचं भान राखून ४० प्रवाशांचे प्राण वाचवले, यासाठी प्रवाशांनी त्याचे आभार मानलेत.
या घटनेत १५ प्रवासी जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही वेळेचं भान राखून प्रवाशांचे या ड्रायव्हरला सलाम ठोकलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.