ट्विटर

किरण बेदींबद्दलचं ट्विट `बोगस` - गडकरी

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पक्षानं किरण बेदी यांना कधीही पसंती दिली नाही, असं स्ष्टीकरण भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलंय.

Apr 16, 2014, 04:40 PM IST

दिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक ट्विट करून पक्षाला चांगलंच अडचणीत आणण्याचं काम केलंय.

Apr 16, 2014, 02:30 PM IST

सोशल नेटवर्किंग साईटवरही मोदीच अव्वल!

लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या देशभरात `अब की बार मोदी सरकार`चा फिव्हर चांगलाच चढलाय.

Apr 14, 2014, 11:46 AM IST

महिलांनी मोदींवर आता विश्वास कसा ठेवायचा - दिग्विजय सिंह

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".

Apr 10, 2014, 12:26 PM IST

विराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज

भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. कालच त्यांने विराट खेळी केली. आता तो मैदानाबाहेर जाहिरात क्षेत्रात नाव कमवून आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेय. आता तर तो मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय. त्याला लग्नाची मागणी घालण्यात येत आहे. चक्क इंग्लंडच्या गोरीने ट्विटरच प्रपोज केलं.

Apr 5, 2014, 02:28 PM IST

ज्युनिअर देवरा - ज्युनिअर ठाकरेंचं `ट्विटरवॉर`

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यात आज जोरदार आमना-सामना झाला. रस्त्यावर उतरून राडे करणाऱ्या शिवसेनेचं युवा नेतृत्व आणि दक्षिण मुंबईचे युवा खासदार एकमेकांना भिडले. पण, हे युद्ध रंगलं ते ट्विटरच्या वॉलवरून...

Mar 6, 2014, 08:30 PM IST

ट्विटरच्या लेआऊटमध्ये मोठा बदल...

ट्विटर मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये अमुलाग्रबदल करण्यात येणार आहे. लवकरच नव्या रूपात ट्विटर आपल्यासमोर येणार आहे. काही प्रमाणात फेसबुक सारखा लूक नवीन ट्विटरचा असेल, अशी माहिती मिळते आहे.

Feb 12, 2014, 07:51 PM IST

सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान

आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.

Jan 30, 2014, 08:03 PM IST

सुनंदा पुष्कर यांच्या मृ्त्यूनं `ट्विटर` विश्व हादरलं!

सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसलाय. यामध्ये अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पाहुयात कुणी कुणी काय म्हटलंय...

Jan 17, 2014, 11:16 PM IST

आयएसआय एजंट सोबत शशी थरूर यांचं अफेअर- सुनंदा पुष्कर

नेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. मात्र यावेळी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय.

Jan 16, 2014, 11:22 AM IST

`ट्विटर`वर आपल्या नावानं जोक्स पाहून आलोक नाथ म्हणतात...

आपल्या नावानं जोक्सचा एक सिलसिलाच सोशल वेबसाईटवर सुरू आहे, असं ‘हम साथ साथ है...’ या सिनेमातील सलमानच्या वडीलांची भूमिका निभावणाऱ्या आलोकनाथ यांच्या काही गावीही नव्हतं... जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, तेव्हा मात्र...

Jan 2, 2014, 12:21 PM IST

केजरीवालांचे बोगस ट्विटर खाते, अण्णांना शिव्या

अरविंद केजरीवाल यांच्या नावे बोगस ट्विटर अकाउंट उघडून त्यावरून अण्णा हजारेंवर शिव्यांची लाखोली वाहिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

Dec 17, 2013, 05:03 PM IST

ट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!

सध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.

Nov 18, 2013, 07:59 PM IST

रागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!

दबंग खान सलमान पुन्हा एकदा भडकलाय आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर आवडत नसेल तर तुम्ही बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका, असा सज्जड दमही त्यांना प्रेक्षकांना दिलाय.

Nov 11, 2013, 04:54 PM IST

९० टक्के भारतीय मोदींच्या विरोधात - जावेद अख्तर

९० टक्के भारतीयांचा मोदींना विरोध आहे, असं म्हणणं आहे प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर यांचं... त्यांच्या मते भारताचे भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना ९० टक्के लोकांनी नापसंत केलंय. नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलल्यामुळं आपल्याला अश्लील मॅसेज येत असल्याची तक्रारही जावेद अख्तर यांनी केलीय.

Nov 7, 2013, 12:36 PM IST