www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
ट्विटर मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये अमुलाग्रबदल करण्यात येणार आहे. लवकरच नव्या रूपात ट्विटर आपल्यासमोर येणार आहे. काही प्रमाणात फेसबुक सारखा लूक नवीन ट्विटरचा असेल, अशी माहिती मिळते आहे.
नव्या ट्विटरमध्ये प्रोफाइल पेज उजव्या बाजूला असेल. त्यामुळे हेडरला भरपूर स्पेस मिळणार आहे.
ट्विटरचा हा नवीन स्टाइल डेस्कटॉपसाठी असणार आहे. मोबाईलवर ते तितकंस चांगलं दिसणार नाही. डेस्कटॉपवर प्रत्येक ट्विट मोठ्या फॉन्टमध्ये दिसेल.
ट्विटरचा जुना लूक हा काहीसा व्हर्टिकल कॉलम टाइपसारखा होता. तो आता एखाद्या पेपर-अॅप सारखा दिसणार आहे.
याशिवाय ट्विटरमध्ये पॉप-अप नोटीफिकेशन फिचर जोडण्यात येईल. त्यामुळे मॅसेजवर तात्काळ रिअॅक्शन देता येईल. याचप्रमाणे रिट्विट आणि फेव्हरिट यासारखे नोटीफिकेशन अॅड करण्यात येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.