ऑलिम्पिक

तोडला दरवाजा... बाहेर निघाला अॅथलिट

रशियात सुरु असलेल्या सोची ऑलिम्पिकमध्ये एक गंमतीदार गोष्ट घडली. आंघोळीसाठी गेला असताना अमेरिकेचा एक अॅथलिट चक्क बाथरूममध्येच अडकला... बाहेर पडण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्नही केले... पण, शेवटी दरवाजा फोडूनच त्याला बाहेर पडावं लागलं.

Feb 9, 2014, 07:36 PM IST

रशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान

बातमी रशियात सुरु झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकची. रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झालेत.

Feb 8, 2014, 09:45 AM IST

भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!

भारताचा ऑलिम्पिकचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आयओसीनं आयओएवर आपली बंदी कायम ठेवली आहे. आयओसी आपल्या अटींवर ठाम आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं आयओसीच्या अटी मान्य न केल्यामुळे भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 5, 2013, 06:39 PM IST

भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले

भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघावर बंदी घातली होती.

May 15, 2013, 06:49 PM IST

अन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर

२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.

Mar 7, 2013, 10:14 PM IST

रहस्यभेद!

लंडन ऑलिम्पिकमध्ये चीनने ८७ मेडल्स मिळवून जगात दुसरा क्रमांक पटकावलाय... कसे घडवले जातात हे चॅम्पियन्स? कसे मिळवतात गोल्ड मेडल? किती कठीण आणि कठोर असते या प्रवासाची सुरुवात?

Aug 13, 2012, 10:13 PM IST

ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा कार्यक्रम

लंडन ऑलिम्पिक मध्ये आज भारताचा कार्यक्रम ह्या प्रकारे आहे. ८०० मी. धावण्याची स्पर्धा (महिला) सेमीफायनल
टिंटू लुका (भारतीय वेळेनुसार आज रात्री दहा वाजता असेल)

Aug 9, 2012, 02:56 PM IST

भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला

ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.

Aug 4, 2012, 10:40 AM IST

विजयी 'चायना', पराभूत सायना

सायना नेहवाल उपांत्य फेरीत जागतिक पातळीवरील क्रमांक एकची चीनची खेळाडू यिहान वांग हिच्याकडून सरळ दोन सेटमध्ये पराभूत झाली. वँगने सायनाला २१-१३ व २१-१३ अशा सरळ सेटमध्ये सहज हरविले.

Aug 3, 2012, 03:28 PM IST

मुष्टियोद्धा विजेंदर क्वार्टर फायनलमध्ये

बीजिंगमधील कांस्य पदक विजेता २६ वर्षीय विजेंदर याने गुरूवारी रात्री एक्सेल एरिनामध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकन बॉक्सर टेरेल गौशा याचा १६-१५ने पराभव केला.

Aug 3, 2012, 11:32 AM IST

सायनाचा विजय, भारताला दिलासा

ऑलिंपिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या सायना नेहवालनं आज विजय संपादन केला. स्वीत्झर्लंडच्या सब्रिनाचा अवघ्या २२ मिनिटांत २१-९, २१-४ असा फडशा पाडून सायनानं आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलं.

Jul 29, 2012, 11:19 PM IST

लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी

लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये दक्षिण कोरियाच्या डोंग ह्युननं लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केलीय.

Jul 28, 2012, 04:22 PM IST

ऑलिम्पिकमध्ये भारताची सलामी...

लंडन ऑलिम्पिक हे भारतीयांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं ऑलिम्पिक आहे. यंदा भारताचे तब्बल ८३ खेळाडू देशाला मेडल मिळवण्यास झुंज देताना दिसतील.

Jul 28, 2012, 08:22 AM IST

लंडन ऑलिम्पिक: घुमणार रेहमानचे सूर

सर्वांनाच वेध लागतेल ते लंडन ऑलिम्पिकचे... या ऑलिम्पिकमध्ये फक्त भारतीय खेळाडूच नाही तर भारतीय कलाकारही आपलं कौशल्य दाखवण्यास सज्ज झालेत. जगविख्यात ए. आर. रेहमानच्या गाण्यानेच ऑलिम्पिकची सुरवात होणार असून या ऑलिम्किचं भारतीय कनेक्शन कसं असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येतंय.

Jul 27, 2012, 11:10 AM IST

मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.

Jul 25, 2012, 01:12 PM IST