एसटी कर्मचारी संप

चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान

 ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथाा दिवस असून या चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  

Oct 20, 2017, 12:50 PM IST

संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.

Oct 20, 2017, 08:48 AM IST

सरकारचा हा प्रस्ताव अमान्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत एकून चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या तरी एसटी कामगार संघटनांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी संप सुरुच आहे.  

Oct 19, 2017, 08:49 AM IST

कर्मचाऱ्यांना वाढवायला पगार नाही, पण उधळपट्टी भरपूर...

  पगारवाढीवरून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असताना आता एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी एसटीमध्ये झालेल्या उधळपट्टीची चर्चा करतायत. 

Oct 18, 2017, 07:20 PM IST

प्रशासनाचा अल्टीमेटम धुडकावत एसटी कर्मचारी संपावर ठाम

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी ऎन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.

Oct 18, 2017, 08:30 AM IST

२५ वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते

पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते असे म्हणाले. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

Oct 17, 2017, 12:13 PM IST