संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.

Updated: Oct 20, 2017, 08:48 AM IST
संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल title=
संग्रहित छाया

मुंबई : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.

खासगी गाड्याही एसटीच्या किमतीत प्रवासी घेऊन जात आहेत तरीसुद्धा प्रवाशी कमी असल्याचा दावा गाडी मालक करीत आहे , मुंबईहून गावी तर जाऊ पण पुढे काय, असा सवाल प्रवाशाना पडलाय.

गेले ४ दिवस सुरु असलेल्या संपाला एसटी कर्मचारीही कंटाळले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन आलेले ड्रायव्हर्स तसेच कंडक्टर्स ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांचे प्रचंड हाल सुरु आहेत. यंदाची दिवाळी आपल्यासाठी काळी दिवाळी ठरलायची त्यांची भावना आहे. कर्मचारी संघटनेचे नेते आणि सरकार यांनी या संपावर तात्काळ तोडगा काढावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. 

दिवाळीच्यानिमित्त सोडण्यात येणाऱ्या गाड्यांसाठी पुण्यात खास जादा गाड्यांसाठी बसस्थानक उभारण्यात येते. यावर्षीही शिवाजीनगरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले. मात्र संपामुळं कार्यान्वित होण्याआधीच ते गुंडाळण्याची वेळ आलीय.